शिवसेनेला कोणी अल्टिमेटम देऊ शकत नाही – संजय राऊत

0
554

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – अल्टिमेटम हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाही. आम्हाला कोणी अल्टिमेटम देऊ शकत नाही, असे  शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी  म्हटले आहे. शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप आग्रही आहे. मात्र, शिवसेनेने भाजपला युतीसाठी अद्यापही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेला युतीबाबत अल्टिमेटम दिल्याचे सांगितले जात आहे. यावर राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.    

संजय राऊत म्हणाले की, एक वर्षापूर्वीच शिवसेनेने कार्यकारणी अधिवेशनात स्वबळाचा ठराव मंजूर केला होता. स्वबळावर लढण्याची शिवसेनेची भूमिका ठाम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार  आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांची नुकतीच भाजप खासदारांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी शिवसेना सोबत न आल्यास स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचना खासदारांना केली आहे. युती करण्यासाठी भाजपने शिवसेनेला अल्टिमेटम दिला असल्याचे देशाच्या राजकारणात शिवसेनेला अल्टिमेटम देणारा अजून कोणी आला नसून अल्टिमेटम आमच्या शब्दकोशातही  नाही, असे संजय राऊत म्हणाले.