शिवसेनेने ठोकले शड्डू; २०२४ च्या तयारीला लागा – संजय राऊत

0
198

कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) : शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. दरम्यान ते आज आणि उद्या कोल्हापूरात सभा आणि बैठकांसाठी गेले असताना माध्यमांना बोलत होते. २०२४ च्या निवडणुकांसाठी तयार राहा असं अवाहन त्यांनी केलं आहे.

“संभाजीराजेंना आम्ही उमेदवारीसाठी ऑफर केली होती पण त्यांनी ती स्विकारली नाही, तो प्रश्न आता संपला आहे, त्यांच्याविषयी आमच्यात आदर आणि प्रेम आहे तो तसाच राहणार आहे.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ते कोल्हापूरला गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२४ च्या निवडणुका लढवण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत असंही ते म्हणाले. तसेच “महाविकास आघाडीने कोणताही जनतेच्या हिताचा निर्णय घेतला तर भाजपाने टीका करण्याचा पवित्रा घेतला आहे पण शिवसेना आणि महाविकासआघाडी ठामपणे पुढे जात आहे” असं ते म्हणाले. शिवसेनेने संभाजीराजेंचा शब्द पाळला नाही यावरून चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर बोलताना “चंद्रकांत पाटलांनी चोमडेपणा करून नये” असा टोला लावला आहे.