आर्यन खान देश सोडून अमेरिकेत राहणार ?

0
273

मुंबई, दि. २८ (पीसीबी) आर्यन खान अमेरिकेत जाण्याच्या बातमीनं जोर धरला आहे. काही जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे की,”आता आर्यन खानला ड्रग्ज केस प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे, आता कायद्यानं त्याच्यावर जी बंधनं लादली होती ती अर्थातच यानंतर काढण्यात आली आहेत आणि तो आता आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतो. त्यामुळे आर्यन खाननं आता अमेरिकेला निघून जाणाचा निर्णय घेतला आहे. पण तो तिथे स्थायिक होण्यासाठी कायमचा निघून जाणार नाही. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील एका शोसाठी त्यानं हा निर्णय घेतला आहे. आर्यन खानला स्क्रिप्ट रायटिंग मध्ये करिअर करायचं आहे. आणि त्यासाठीच अमेरिकेत जाऊन काही गोष्टींचं आकलन करण्यासाठी,त्या शिकण्यासाठी तो अमेरिकेत जात आहे”.

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. २०२१ मध्ये आर्यन खानला २६ दिवसांसाठी अटक केलं गेलं होतं आणि तो जेलमध्ये राहिला होता. अर्थात,त्यानंतर आर्यन खानला जामिन मिळाला होता. त्या दिवशी मन्नत मध्ये दिवाळी साजरी करण्यात आली होती. अटक झाल्याच्या काही महिन्यानंतर आता आर्यन खानला या केसमधून क्लीनचीट मिळाली आहे. २७ मे ला आर्यन खानचा लहान भाऊ अबराम खानचा वाढदिवस होता. मन्नत मध्ये यादिवशी डबल सेलिब्रेशन केलं गेलं. आता आर्यन खानला ड्रग्ज केसमध्ये क्लीनचीट मिळाल्यानंतर चर्चा रंगली आहे ती तो भारत सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याची. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर.