शिवसेना धर्मनिरपेक्ष नाही पण भाजपसारखी धर्मांधही नाही – हुसेन दलवाई

0
787

नवी दिल्ली,दि.२०(पीसीबी) – शिवसेना धर्मनिरपेक्ष नाही पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सौजन्यशील नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेले बदल पाहावयास हवेत. आरएसएस-भाजपची भूमिका शिवसनेने कधीही स्वीकारलेली नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे साबीर शेख कामगारमंत्री होते हाही इतिहास आहे. अब्दुल सत्तार शिवसेनेकडून आमदार झाले. भाजपने किती मुस्लिमांना उमेदवारी दिली? शिवसेना धर्मनिरपेक्ष नाही पण भाजपसारखी धर्मांधही नाही. त्यामुळे काँग्रेसने सत्तास्थापनेची संधी दवडू नये, असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांना बळ द्यायचं असेल तर काँग्रेसने शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्तास्थापन करावी, असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.

मी आणि माझ्या कुटुंबियांनी मुंबई दंगलीची झळ अनुभवली आहे. तेव्हाही शिवसेनेशी संघर्ष केला. १९८५ साली विधानसभा निवडणुकीत मला शिवसेना समर्थकांनी मारहाण केली. असं असलं तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हाच शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादीचा धर्म असावा, असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.