शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखेंच्याविरोधात काँग्रेस देणार ‘हा’ तगडा उमेदवार   

0
527

अहमदनगर, दि. ३० (पीसीबी) – काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले आणि राज्यात मंत्रिपद मिळविलेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शिर्डी मतदारसंघातून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.  

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. या मुलाखतींमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त उमेदवार इच्छुक  आहेत. तसेच या मतदारसंघातून सत्यजित तांबे यांनी उमेदवारी मागितली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजीत तांबे  यांनी विखे विरोधात  निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.  त्यांना जर तिकीट मिळाले तर   राधाकृष्ण विखे-पाटील  विरोधात सत्यजित तांबे अशी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांना शह देण्यासाठी बाळासाहेब थोरात  प्रयत्नशील आहेत. यामुळेच थोरात या मतदारसंघातून भाचे तांबे यांना रिंगणात उतरवून विखें यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान संगमनेरमधून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला आहे.