शिखर बँक घोटाळा प्रकरण: चौकशीसाठी एसआयटीची स्थापना तर अजित पवारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

0
812

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अजित पवारांसह इतर ७६ जणांवर मुंबईतील एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आता बचावासाठी अजित पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे घोटाळ्याच्या तपासासाठी एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त हे या पथकाचे प्रमुख असतील.

या घोटाळ्यात अनेक पक्षांचे मोठे नेते आरोपी आहेत. या घोटाळ्यामुळे १ जानेवारी २००७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत सराकारी तिजोरीला २५ हजार कोटी रुपयांच नुकसान झाल्याच आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे अजित पवारांसह इतर बडे नेते अडचणीत सापडले आहेत.