शिखर बँक घोटाळा प्रकरण: अजित पवारांसह अनेक बेडे नेते अडचणीत; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या सहा याचिका

0
724

दिल्ली, दि. २ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश योग्यच असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांना मोठा दनका बसला आहे.

यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक बेडे नेते अडचणीत सापडले आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, आधी गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यात यावी, यासाठी संचालकांनी सहा याचिकांद्वारे तातडीने सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

मात्र आज संचालकांच्या या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने या सर्वच्या सर्व सहाही याचिका फेटाळून लावल्या त्यामुळे या प्रकरणात कोणालाच दिलासा मिळालेला नाही. सुप्रीम कोर्टाचे न्या. अरुणकुमार मिश्रा आणि न्या. एम. आर. शहा यांनी या याचिका फेटाळल्या आहेत.