शाळेतल्या २० चिमुरड्यांवर केले अनैसर्गिक कृत्य; शिक्षकाला अटक

0
730

नांदेड, दि.४ (पीसीबी) –  नांदेड मध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून स्वत:ला गुरू म्हणवणाऱ्या नराधम शिक्षकाने तब्बल २० चिमुकल्या मुलींवर अनैसर्गित कृत्य केल्याचे  समोर आले आहे. याप्रकरणी नराधाम शिक्षकाला अटक केली आहे.

स्वप्नील शृंगारे  असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नांदेड येथील प्रबोधन शाळेमध्ये फक्त चौथीपर्यंतच वर्ग आहे. गेल्या ६ महिन्यांपासून शिक्षक मुलींवर अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार करत होता. जर कोणालाही याबद्दल सांगितले तर तुम्हाला इमारतीवरून खाली फेकून देईन अशी धमकी शिक्षकाने चिमुकल्यांना दिली होती. शाळेच्या वरच्या मजल्यावर घेऊन जात नराधम त्यांच्यावर अत्याचार करत होता. दरम्यान, या सगळ्या प्रकाराला घाबरून विद्यार्थीनींनी शाळेत जाण्यासाठी नकार दिला. त्या रोज घाबरून राहायच्या. ही बाब पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकाराची चौकशी केली आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका पीडित विद्यार्थीनीच्या आईने इतर पालकांशी चर्चा केली आणि घटनेची माहिती मिळवली. संतप्त पालकांनी शाळेमध्ये घुसून शिक्षकाला बेदम चोप दिला. तर शाळेच्या अशा कारभारामुळे शाळेला टाळे ठोकले. या प्रकरणाची शिक्षकाला विचारणा केली असता त्याने पालकांना उद्धट भाषेत उत्तर दिले. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात बाललैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षक स्वप्नील शृंगारे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.