शहरात सोमवारी रात्री 31 मिली मीटर पावसाची नोंद; काही भागात साचले पाणी

0
219

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी रात्री 31 मिली मीटर पावसाची नोंद झाली. शहरातील खोलगट भागात पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेने बॅरिकेट्स लावून ते रस्ते बंद केले होते. कासारवाडीतील शंकरवाडी पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण अतिशय कमी होते.

परतीच्या पावसाने हाहाकार माजविला. सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवड शहरात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. काही ठिकाणी पाण्याचा निचरा झाला. तर, खोलगट भागात पाणी साचले. काही ठिकाणी निचरा होऊ शकला नसल्याने रस्त्यावरही पाणी साचले होते. पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते.

खोलगट भागात पाणी साचले होते. सकाळपर्यंत त्या पाण्याचा निचरा झाला. जिथे पाणी साचले तिथे बॅरिकेट्स लावले होते. रहाटनीत झाड पडण्याची घटना घडली. त्यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. यंत्रणा रात्रभर सतर्क होती. यंत्रणेला मदतीसाठी पुण्यात जावे लागले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी रात्री दुचाकीवर फिरून लक्ष ठेवले. क्षेत्रीय कार्यालयातील यंत्रणाही सतर्क होती. आयुक्त शेखर सिंह हे देखील लक्ष ठेवून होते.