शहरातील विकास कामांसाठी ७ कोटींच्या खर्चास स्थायीची मंजुरी

0
482

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ७ कोटी १७ लाख रूपये खर्चास आज (बुधवार) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

प्रभाग क्रमांक ४ बोपखेल रामनगर येथे नविन शौचालय बांधणेकामी येणा-या सुमारे ४१ लाख ५४ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविणे व विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ४ कोटी १४ लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

विविध उद्यानात पाणीपुरवठा करणेकामी जुन्या बोअरवेल दुरूस्त करणे व आवश्यकतेनुसार नविन बोअरवेल घेणेबाबत येणा-या सुमारे १४ लाख ९९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड मनपाचे सर्व दवाखाने, रूग्णालये यांना तातडीने आवश्यक औषधे, साहित्य उपलब्ध होणेकामी येणा-या सुमारे ५० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.