शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे उमेदवार

0
623

मुंबई, दि. १० (पीसीबी) : विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून उमेदवारांची माहिती दिली. त्याचबरोबर दोन्ही उमेवादारांच्या विजयाबद्दल विश्वासही व्यक्त केला.

माजी मंत्री शशिकांत शिंदे (सातारा) आणि अमोल मिटकरी (अकोला) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार देण्यात आली. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे, असे जयंत पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत असून, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.