शरद पवार पंतप्रधान म्हटल्यावर १० सेकंदात गाढ झोप येईल – सुधीर मुनगंटीवार

0
1843

वर्धा, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान म्हटल्यावर १० सेकंदात गाढ झोप येईल, अशा शब्दांत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांची गुरूवारी (दि. १) खिल्ली उडवली.

वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही खिल्ली उडवली.

मुनगंटीवार म्हणाले, “खाटेवर पडल्या पडल्या कधी विचार करा. देशाचा पंतप्रधान कोण होऊ शकतो. नरेंद्र मोदी म्हटल्यानंतर नवचैतन्य जागृत होईल. शरद पवार पंतप्रधान होतील, असा विचार केला, तर १० सेकंदात झोप येईल. राहुल गांधी यांचा विचार केल्यास झोपच येणार नाही.”