व्हायचे होते डॉक्टर; मात्र, झालो डॉक्टरांची मंत्री – गिरीश महाजन

0
879

जळगांव, दि. २ (पीसीबी) – वडिलांची मी डॉक्टर व्हावे, अशी  इच्छा होती. वडिलांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर काही होता आले नाही, मात्र मी डॉक्टरांचा मंत्री झालो, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.  

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नुतनीकरण करण्यात  आलेल्या डायलिसीस युनिटचे उद्घाटन  महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी  ते बोलत होते. यावेळी त्यांनी नव्याने सुरु झालेल्या वैद्यकीय बॅचला आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या.

मी अभ्यासात फारसा हुशार नव्हतो. अभ्यासाऐवजी मला नेहमी कुस्तीमध्ये आणि खेळांमध्ये आवड होती. त्यामुळे माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. तसेच वर्गातील हुशार विद्यार्थी सीआर होतात, मात्र मी पहिलवान होतो. त्यामुळे सीआर झालो, पुढे यूआरही झालो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर राजकारणात येऊन मंत्रीही झालो, असे ते म्हणाले.