व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाला ११ व्या मजल्यावरुन खाली फेकले

0
780
संग्रहित
पुणे, दि.११ (पीसीबी) – पुण्यातील कोंढवा परिसरात व्याजाचे पैसे न दिल्याने एका तरुणाला ११ व्या मजल्यावरुन खाली फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अभिनव जाधव, अक्षय गोरडे, तेजस गोरडे असे या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील कूल उत्सव सोसायटीमध्ये मृत तरुण सागर आरोपींसोबत गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत होता. मयत सागर चलवेरी याने तिघा मित्रांकडून १५ हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. हे पैसे सागर सोमवारी देणार होता. पण तो देऊ शकला नाही. यावरुन तिघांनी त्याला पैसे कधी देणार असा जाब विचारत बेदम मारहाण केली. मारहाणी दरम्यान सागरला इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून ढकलून देण्यात आले. या घटनेत सागरचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.