व्याघ्र प्रकल्पात तब्बल ३५ वाघ आढळले

0
460

प्रतिनिधी,दि.१० (पीसीबी) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दि ६ व ७ मे रोजी करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत तब्बल ३५ वाघांसह १७ हजार १८५ प्रणी आढळले. वन अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय वनकर्मचारी आणि मजूर यांच्या सहाय्याने वन्यप्राण्यांची गणना व नोंद करण्यात आली. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे पर्यटक,प्राणीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक या गणनेसाठी उपस्थित होऊ शकले नाही,.

व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वन्यजीव गणनेची माहिती देताना सांगितले कि, *यंदा वन्यजीव गणनेत ३५ वाघ, ४० बिबटे, ३४० अस्वल, १७२ रानकुत्रे, ७५२ गवे आणि मोठ्या प्रमाणात भक्ष्य आणि इतर प्राणी आढळून आले आहेत. “. व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेल्या सीन विभागात १४०, गुगमल मध्ये ९५, अकोटमध्ये १४० तर मेळघाट बफर झोनमध्ये ५८ मचाण उभारण्यात आल्या होत्या, दरवर्षी या उपक्रमामध्ये वन्यजीव प्रेमी सहभागी होतात, परंतु सध्या कोरोना वायरसमुळे लॉकडाऊन असल्याने पर्यटक, प्राणीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक या गणनेसाठी येऊ न शकल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू व विदर्भातील अन्य जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी या गणेनेला उपस्थित राहून निसर्गाचा अनुभव घेतात. मात्र, यंदा लाॅकडाऊनमुळे केवळ वनविभागातील कार्यरत अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सहभागी करण्याचा निर्णय घ्यावा लागला.