व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
196

चिखली, दि. २८ (पीसीबी) – व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता पतीने तिचा छळ केला. हा प्रकार सन 2019 ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत टाळगाव चिखली येथे घडला.

संतोष विलास सिनलकर (वय 30, रा. टाळगाव चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय पीडित विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती संतोष याने फिर्यादी विवाहितेकडे माहेरहून त्याला व्यवसाय करण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली. पती वारंवार करत असलेल्या या मागणीला विवाहितेने नकार दिला. त्यावरून पतीने विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ केली. हातपाय तोडण्याची धमकी देत विवाहितेला मानसिक व शाररिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.