विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी महारक्तदान शिबीर

0
923

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – विश्व हिंदू परिषद बजरंग दल पिंपरी चिंचवड शहर विभागाच्या वतीने शहरात व मावळ विभागात रविवारी (दि. २८) महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २ नोव्हेंबर १९९० रोजी कारसेवकांवर झालेल्या गोळीबारात हौतात्म्य प्राप्त झालेले कोठारी बंधू आणि हजारो रामभक्तांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. शिबीरात रक्तदान करण्याऱ्या सर्वांना बजरंग दलाच्या वतीने टी शर्ट भेट देण्यात येणार आहे.

याबाबत बजरंग दल प्रांत संयोजक लहुजी धोत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संदेश भेगडे यांनी गुरुवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल साठे, विश्व हिंदू परिषदेचे शहर मंत्री नितीन वाटकर, बजरंग दल शहर संयोजक नाना सावंत, सागर चव्हाण, अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते.

संदेश भेगडे म्हणाले, “या महारक्तदान शिबीराअंतर्गत पिंपरीगावात भैरवनाथ मंदिरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदात्यांनी सहभागी व्हावे. तसेच चिंचवड – मनपा शाळा वाल्हेकरवाडी चौक आणि केंद्राई गो शाळा सुदर्शन नगर, भोसरी – सखुबाई गवळी उद्यान, मोशी – भारत माता चौक, चिंबळी – जिल्हा परिषद शाळा, चिखली – विठ्ठल रुखमाई मंदीर आणि घरकुल वसाहत, निगडी – सिध्दी विनायक नगरी, आकुर्डी – संजय काळे मैदान, कासारवाडी – गणेश मंदीरासमोर शास्त्रीनगर, थेरगाव – बोट क्लब रोड दत्तनगर, शिवमंदीर गणेश नगर, गणपती मंदीर भोरडेनगर, साई मंदीर थेरगाव गावठाण, वाकड – म्हातोबा मंदीर, पिंपळे सौदागर – महादेव मंदीर पोलिस चौकीसमोर, पिंपळे गुरव – ज्येष्ठ नागरिक संघ सुदर्शन नगर, बोपखेल – मारुती मंदीर, दापोडी – हनुमान मंदीर दापोडी गावठाण, सांगवी – नरसिंह हायस्कुल, रहाटणी – नखाते वस्ती, काळेवाडी – विठ्ठल रुख्मीनी मंदीर, इंद्रायणी नगर – मिनी मार्केट इंद्रायणी नगर, यमुनानगर -सावित्रीबाई फुले बिल्डींग, रुपीनगर – हनुमाननगर अशा २७ ठिकाणी आणि मावळ विभागात १७ ठिकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.”