विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

0
821

निगडी, दि. १३ (पीसीबी) – सासरी नांदायचे असल्यास माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 11 नोव्हेंबर 2005 ते 7 ऑगस्ट 2021 या कालावधीत प्राधिकरण निगडी आणि चिंचवड येथे घडली.

विश्वेस रमेश सरदेसाई (वय 40), सासरे रमेश श्रीपाद सरदेसाई (वय 72), दोन महिला आरोपी, दिर गिरीश रमेश सरदेसाई (वय 48), अमोल सरदेसाई (वय 45, सर्व रा. प्राधिकरण, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने बुधवारी (दि. 11) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना तिला घालून पाडून बोलून तसेच टोमणे मारून त्यांना त्रास दिला. तसेच उपाशी ठेऊन, चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ केला. नांदायचे असल्यास आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.