विराट कोहलीसोबतच्या वादानंतर पंचाने दरवाजा तोडला

0
784

चेन्न्ई, दि. ७ (पीसीबी) – एम चिन्नास्वामी स्टेडिअममधील सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत इंग्लिश अंपायर  नीजल लॉन्ग यांचा वाद झाला होता.  या वादानंतर संतापाच्या भरात नीजल लॉन्ग हैदराबादचा डाव संपल्यानंतर  रुममध्ये गेले. तेथे त्यांनी जोरात दरवाजावर लाथ  मारली. ही लाथ इतकी  जोरात की दरवाजा तुटून पडला.

रॉयल चॅलेंजर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल सत्रातील लीग राऊंडमधील शेवटचा सामना झाला.  यावेळी अंपायर नीजल लॉन्ग यांनी आरसीबीचा गोलंदाज उमेश यादवच्या एका चेंडूला नो बॉल दिला. पण जेव्हा रिप्ले पाहण्यात आला. तेव्हा अनुभवी नीजल लॉन्ग यांच्याकडून चूक झाल्याचे स्पष्ट झाले. उमेश यादवचा पाय रेषेच्या मागे पडला असल्याचे स्पष्ट दिसत होते.

नियमाप्रमाणे हा नो बॉल नव्हता. यामुळे गोलंदाज उमेश यादवने आणि विराट कोहली नाराज झाले जे साहजिक होते. मैदानातील स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर उमेश यादव आणि विराट कोहली यांनी नीजल लॉन्ग यांच्या चुकीच्या निर्णयाचा विरोध केला. मात्र, अंपायर नीजल लॉन्ग यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही.