विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार; संभाजी बिग्रेडची घोषणा

0
833

पुणे, दि. १७ (पीसीबी) – पंचवीस वर्ष दुसऱ्यांसाठी लढलो, आता स्वतःसाठी जिंकण्याकरीता विधान निवडणुका लढणार आहोत, असे सांगून विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार, अशी माहिती   संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी आज (शनिवार)  पुण्यात  पत्रकारांशी बोलताना दिली.

सौरभ खेडेकर म्हणाले की, विधानसभा उमेदवारांची पहिली यादी पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. समविचारी पक्षाबरोबर ‘संभाजी ब्रिगेड’चे वरिष्ठ नेते चर्चा करत आहे. सन्मानाने सोबत घेतले तर ठिक अन्यथा स्वतंत्र लढणार.  यावेळी सत्तापरीवर्तन अटळ आहे.  आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत.

राज्य सरकारने पूरग्रस्तांना पुरेशी मदत  दिलेले नाही. हजारो संसार उध्वस्त झाले आहेत.  मंत्री आणि सरकार सुस्त आहे. निवडणुकीमध्ये आमचा जन्म दुसऱ्यांना मोठे करण्यासाठी झालेला नाही. यावेळी मात्र आम्ही गाफील राहणार नाही. पुण्यातूनच विधानसभेवर पहिला समतेचा ‘भगवा’ झेंडा ‘संभाजी ब्रिगेड’ फडकवणार आहे,  असा विश्वास खेडकर यांनी व्यक्त केला.