विखे-पाटील पितापुत्र लवकरच भाजपवासी ?

0
643

अहमदनगर, दि. ६ (पीसीबी) – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश  करतील. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यापेक्षा भाजपवासी झालेले बरे, असा विचार करून विखे पाटील पिता-पुत्र  काँग्रेसला रामराम करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. राष्ट्रवादीकडे  नगर लोकसभा मतदारसंघाची जागा आहे. ही जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तयार नाहीत. त्यामुळे  निवडणुकीची तयारी केलेले डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे.

राजकीय शत्रू असलेल्या माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या नातवाला नगरमधून राजकीय ताकद द्यायची नाही, असे राष्ट्रवादीने ठरवले आहे. त्यामुळे सुजयसाठी ही जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही. दरम्यान, सुजयला भाजपमध्ये घेऊन नगरमधून उमेदवारी देण्यास मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते सकारात्मक आहेत, असेही सूत्रांकडून सांगितले जात आहे.