विकास कामात कोणताही घोटाळा नसेल असे काम दाखवा आणि ५०१ रुपये घेऊन जा; मनसेचे राज्यमंत्र्यांना आवाहन

0
446

मुंबई, दि १ (पीसीबी) – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांसमवेत मुंबई मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीत डोंबिवली शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर मनसेने रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपवर कडाडून टीका केली आहे.

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम आणि केडीएमसी गटनेते मंदार हळबे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना कदम यांनी ‘डोंबिवलीतील चाकरमानी ट्रेनमध्ये लटकत प्रवास करतात त्यानंतर पुन्हा रस्ते मार्ग वाहतूक कोंडीत बंद आहेत. न कुठले मनोरंजन केंद्र आहे. स्पोर्ट कॉम्प्लेक्स, नाट्यगृह बंद असतात. साडे चार वर्षे राज्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. या साडे चार वर्षांत डोंबिवलीसाठी त्यांनी मंत्री म्हणून कोणता प्रकल्प आणला’ असा प्रश्न उपस्थित केला.

तसेच या १० वर्षांत एक तरी प्रकल्प, विकासकामे पूर्ण झाली आहेत आणि पूर्ण झालेल्या विकास कामात कोणतही घोटाळा आणि कोणतीही चौकशी लागू नसेल, असे एक तरी विकास काम दाखवावे आणि राज्यमंत्री चव्हाण यांनी मनसेकडून ५०१ रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, असे आव्हान मनसेने दिले आहे.