वाकड येथील सूर्या रूग्णालयातील ५० रूग्ण आणि १२० कर्मचाऱ्यांची सुटका

0
552

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – वाकड येथील सूर्या  रूग्णालयामध्ये  मुळा नदीचे पाणी आज (रविवार)  शिरले होते. यात रूग्णालयातील  ५० रूग्ण आणि १२० कर्मचारी अडकून पडले होते. त्यांची रेस्क्यू टीमने सुटका करून सुरक्षितस्थळी हलवले.   

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, एनडीआरएफचे च्या पथकांने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली.

मुसळधार पावसामुळे व मुळा नदीला पुर आला आहे. पूर्ण रूग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा पडला होता.  ५० रूग्ण आणि १२० कर्मचारी अडकले होते.  त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. अखेर अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, एनडीआरएफच्या पथकांनी या सर्वांची सुटका  केली.