लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून १० वर्षीय मुलाचा मृत्यू  

0
488

लोणावळा, दि. ४ (पीसीबी) – मुसळधार पावसामुळे शेजारील घराची भिंत सख्ख्या भाऊ-बहिणीच्या अंगावर कोसळून भावाचा मृत्यू झाला. तर बहीण  गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना लोणवळ्यातील हनुमान टेकडी येथे आज (रविवारी) सकाळी  घडली.

या दुर्घटनेत कुणाल अजय दोडके (वय १०) याचा मृत्यू झाला आहे. तर नंदिनी अजय दोडके (वय ९)  ही गंभीर जखमी झाली आहे.