वाकडमध्ये २२५ लिटर गावठी दारु जप्त; एकाला अटक

0
372

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – अवैधरित्या रिक्षातून बंदी असलेली गावठी दारु (हातभट्टी) घेऊन जाणाऱ्या एका रिक्षाचालकाला कॅनडेत भरुन आणलेली २२५ लिटर गावठी दारु आणि रिक्षासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलीसांनी केली.