वाकडमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू

0
346

वाकड, दि. ३० (पीसीबी) – रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला एका मोपेड दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवार (दि.२८) रात्री साडेआठच्या सुमारास वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीसमोर घडली.

सविता सिध्दाराम गायकवाड (वय ३५, रा. लोंढेवस्ती, ताथवडे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार, शुभम विजय बाकडे (वय २३, रा. ६०४, सेन्टोस पर्ल सोसा. वाकड) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास सविता या काळाखडक झोपडपट्टी समोरील रस्ता ओलांडत होत्या. यावेळी भरधाव अॅक्सेस दुचाकी (क्र.एमएच/१४/एचजे/७३०७) वरुन आलेल्या शुभम याने सविता यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सविता यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी शुभम याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस हवालदार बिराजदार तपास करत आहेत.