वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स ग्रॅण्ड प्रिक्स ‘इटालियन ओपन स्पर्धेसाठी दत्ता वरकड याची निवड

0
242

पिंपरी दि. ११ (पीसीबी) – इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स ‘ग्रॅण्ड प्रिक्स इटालियन ओपन 2022’ स्पर्धेसाठी साई स्पोर्टस् अकॅडमीच्या दत्ता वरकड याची निवड करण्यात आली आहे.

इटली येथे ही स्पर्धा 2 मे पासून सुरू होणार आहे. पिंपरी- चिंचवड मधील साई स्पोर्टस् अकॅडमी मधील दत्ता वरकड या पॅरा खेळाडूची 100 मीटर धावणे व लांब उडी या क्रीडा प्रकारात निवड झाली आहे. माजी राष्ट्रीय विजेते खेळाडू व पिंपरी-चिंचवड शहर अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष रामदास कुदळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव चंद्रशेखर कुदळे, खजिनदार मनीषा जाधव, उपाध्यक्ष रुस्तुम पठाण, संजय सातव, मंगेश पवार व उमेश जाधव यांनी दत्ता वरकड याचा सत्कार करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

दत्ता वरकड हा पॅरा खेळाडू चंद्रशेखर कुदळे, रुस्तुम पठाण व मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर येथे सराव करीत आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी केदारी मॅडम यांचे त्याला मोलाचे सहकार्य लाभले.