लोकसभा निवडणुकीची अधिसूचना २ किंवा ३ मार्चला निघेल – रावसाहेब दानवे

0
662

धुळे , दि. ६ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीची अधिसूचना २ किंवा ३  मार्चला निघेल, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी धुळ्यात बोलताना  सांगितले. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर आली आहे, त्यामुळे आपापली कामे करून घ्या, नंतर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्हा नगरसेवकांना प्रयत्न करायचे आहेत,  असेही दानवे यांनी म्हटले आहे.  

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप  कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करण्यासाठी धुळ्यात बैठक आयोजित केली होती.  यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. समविचारी पक्षांनी युतीसाठी एकत्र यावे, असे आवाहन दानवे यांनी शिवसेनेला केले आहे.  आगामी निवडणुका भाजप विकासाच्या मुद्यावर लढणार  आहे, असे दानवे यांनी यावेळी सांगितले.