मुंबई पुणे महामार्गावर कासारवाडी जवळ  शिवशाही बस जळून खाक 

0
2188

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – मुंबई पुणे महामार्गावर कासारवाडी जवळील कुंदन नगर येथील गोल्डन टिम्बर मार्ट समोरील रस्त्यावर शिवशाही बस ने अचानक पेट घेतला. आज सकाळी सात च्या सुमारास शिवाजीनगर ते श्रीरामपूर हि शिवशाही बस मुंबई पुणे महामार्गावर कासारवाडी जवळील कुंदन नगर येथील गोल्डन टिम्बर मार्ट समोरील रस्त्यावर आली असताना  बस ने अचानक पेट घेतला.

काही कळायच्या आत आगीने रुद्र रूप धारण केले ,अग्नी शामक दलाच्या कर्मचाऱ्यांना खबर मिळताच अशोक कानडे, अजय कोकणे ,राजू काटकर ,अक्षय पाटील शांताराम ,घारे शिवाजी चेडे आदी कर्मचार्यानी घटनास्थळ गाठून काही अवधीतच आग आटोक्यात आणली पण तो पर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने बस मध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघात मुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.