लोकल आणि एक्सप्रेस ‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी बंद राहणार का? जाणून घ्या सविस्तर…

0
599

मुंबई,दि.२१(पीसीबी) – मुंबईची लोकल सेवा फक्त अंशत:च सुरू राहणार आहे. तर सर्व पॅसेंजर ट्रेन्स २४ तास बंद राहतील. एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी घराबाहेर न पडता घरातच राहावं असं आवाहन रेल्वेद्वारे करण्यात आलं आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला म्हणजे रविवारी ‘जनता कर्फ्यु’चं आवाहन केलं आहे. या दिवशी रेल्वेसेवा चालू राहणार नाही. यावर रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, २२ मार्च रोजी पूर्ण दिवस देशात ३ हजार ७०० ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं यासंबंधी परिपत्रकही काढलं आहे. तसंच मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्याही किमान फेऱ्याच सोडण्यात येणार असल्याचंही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.