‘लोकमान्य’ता असलेल्या जगभरातील नेत्यांमध्ये मोदी पहिले

0
258

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतात. जगातील काही लोकप्रिय नेत्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आहेत. त्यातच आता मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीनं केलेल्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले आहेत. केंद्रीय नेते नारायण राणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही माहिती देताना आनंद व्यक्त केला आहे. “खरंच हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील लोकमान्यता असलेल्या नेत्यांमध्ये तब्बल 77% रेटिंग मिळालं आहे. यामुळे ते पुन्हा एकदा ते सध्याच्या काळातील जगातील सर्वात मोठे नेते ठरले” असं राणे म्हणाले. पुढे ते असंही म्हणाले की, ‘हे रेटिंग जून 2021 मधील 66% टक्क्यांवरून नोव्हेंबर 2021 मध्ये 70 टक्क्यांवर गेलं आणि त्यानंतर आता 77% वर आहे. यामुळे ही अभूतपूर्व वाढ आहे’ असंही राणे म्हणाले आहेत.