लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या – मुख्यमंत्री

0
322

मुंबई,दि.१२(पीसीबी) – लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

कुठेही गर्दी करु नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, असं ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

दरम्यान, ठाकरे सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’चा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता सर्वत्र पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या सवलती तिसऱ्या टप्प्यात कायम राहतील.