लॉकडाऊन चालू असल्यामुळे हानी टळली ? मुसळधार पावसामुळे दिशादर्शक लोखंडी कमान कोसळली; पुणे येथील संचेती चौकातील घटना

0
630

पुणे,दि.१(पीसीबी) – अचानक सुरू झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे आज पुणेकरांची धांदल उडाली. पावसासोबत वाऱ्याचा जोर असल्याने पुणे येथील संचिती चौकातील दिशादर्शक लोखंडी कमान रस्त्यावर कोसळली.

दिशादर्शक फलक रस्त्यावरच पडल्यामुळे शिवाजीनगरकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. नेहमी गाड्यांची गर्दी असणाऱ्या या रस्त्यावरती लॉकडाऊन असल्यामुळे सुदैवानं कोणीही या रस्त्यावरती कोणीही नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्यापासून वाचवली आहे.

तसेच पावसाचा जोर जास्त असल्यामुळे पुण्यातील एका इमारतीवरील फोन कंपनीचा नेटवर्क टॉवर देखील कोसळला आहे. ही घटना सदाआनंद नगर सोमवार पेठ पुणे येथे सायंकाळच्या सुमारास घडली.