देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला; केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर

0
314

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केली. मोदी सरकारनं आणखी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन चालु राहणार आहे.

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड शहरात १७ मे पर्यंत टाळेबंदी कायम राहणार हे स्पष्ठ झआले.