लॉकडाऊनमध्ये सूट लई महागात पडेल जागतिक आरोग्य संघटनेचा सर्व देशांना गंभीर इशारा

0
321

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) : जगभरातील देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यास सुरुवात केली आहे. जगभरात कोरोनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. परंतु, कोरोना व्हायरसला फार हलक्यात घेऊ नका, सूट लई मगहागात पडेल, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) जगभरातील देशांना दिला आहे. थोड्याशा हलगरजीपणामुळेही देशांना पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यासाठी कारण ठरू शकतो.

भारतची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे लॉकडाऊन शिथील होताच लोक रस्त्यावर उतरलेले दिसून आले.बहुसंख्य शहरातून लोक बाजारहट करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. परंतु, दुसऱ्या देशांमध्येही परिस्थिती काही वेगळी नाही. अमेरिकेमध्ये लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केल्यानंतर अनेक लोकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये आपापल्या परिने सूट देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सर्वच देशांना इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने सांगितले की, जर लॉकडाऊन शिथील करण्यात थोडासाही हलगर्जीपणा झाला तर परिस्थीती गंभीर होऊन पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागले.

ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर टेडरोज गेब्रेयेसोस यांनी सांगितले की, ‘लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा धोका वास्तविक आहे. जर देशांना सावध राहून आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतले नाहीत, तर कोरोनाचा कहर पुन्हा वाढण्याचा धोका आहे.’ कारण अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी जगभरातील देश लॉकडाऊन शिथील करत आहेत. डब्ल्यूएचओने सांगितले आहे की, देशांना सध्या आरोग्य यंत्रणेत गुंतवणूक करावी लागेल आणि सर्विलांस सिस्टमवर जोर द्यावा लागेल. याचसोबत टेस्ट आणि कॉन्टॅक्ट्र ट्रेसिंगवर जोर द्यावा लागले.

जगभरात आतापर्यंत ३८ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत या जीवघेण्या व्हायरसमुळे अडिच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगभरात दररोज पाच हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशातच भिती ही आहे की, लॉकडाऊन हटवल्यानंतर हा आकडा आणखी वेगाने वाढू शकतो. तसेच जगासमोर वुहान मॉडेलही आहे, जिथून कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली. परंतु, आता दीर्घकाळाच्या लॉकडाऊननंतर जनजीवन सुरळीत होऊ लागलं आहे.