लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची डोंगर-दऱ्या आणि गड-किल्ल्यांच्या दिशेने धोकादायक वाटचाल

0
384

पुणे,दि.२८(पीसीबी) – सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या संकटाशी लढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत भारतातील अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे. जेणेकरून कोरोना सारखा संसर्गजन्य रोग पसरू नये. परंतु काही नागरिक लॉकडाऊन चा नियम न पाळता घराबाहेर पडत आहेत.

लॉकडाऊन मुळे संपूर्ण देशातील रस्ते, शहरं आणि अगदी गल्लीबोळ सुद्धा बंद करून टाकण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच बसावे लागत आहे. परंतु काही अतिउत्साही नागरिक इतर मार्गाने घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्ते बंद असल्यामुळे नागरिकांना बाहेर फिरता येत नाहीये मग घराबाहेर पडायचे तरी कसे? असा विचार करून काही नागरिक डोंगर-दऱ्या आणि गडकिल्ल्यांचा मार्ग शोधत आहेत.

घरात बसून कंटाळा येतोय आणि बाहेर फिरायला जावं तर पोलिसांचा मार खावा लागतोय तर मग उपाय म्हणून काही लोक आपल्या कुटुंबासमवेत तसेच इतर काही मित्रांच्या टोळक्यात समवेत ग्रुप करून ट्रेकिंगसाठी डोंगर आणि दऱ्यांमध्ये जात आहेत.

पुण्यामधील मावळ भागात हा प्रकार जास्त दिसून येत आहे, गावा गावातील आणि शहरातील रस्ते बंद असल्यामुळे आणि वेळ घालवण्याचे साधन म्हणून अनेक नागरिक डोंगर-दर्‍यांमधे फिरत आहेत. डोंगर-दर्‍यांमधे फिरताना त्याठिकाणी कोणतंही लॉकडाऊन नसतं असा मानस काही नागरिकांचा होत आहे. त्यामुळे अनेक नागरिक डोंगर-दर्‍यांमधे गर्दी करताना दिसत आहेत.

लॉकडाऊन मुळे मिळालेल्या सुट्टीचा वापर करून अनेक नागरिक डोंगर-दर्‍यांमधे पिकनिक साठी जात आहेत कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लॉकडाउन नसतं आणि घराबाहेर का पडला हे विचारणारं सुद्धा कोणीच नसतं असा विचार अनेक नागरिक करीत आहेत. परंतु अशामुळे डोंगर दऱ्यांमध्ये सुद्धा नागरिक गर्दी करताना दिसत आहेत.