लॉकडाउन आणि म्युकरमायकोसिसच्या बाबतीत राज्य सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय

0
267

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : राज्यात कोरोनाच सावट असताना आता म्युकरमायकोसिसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याच्या औषधांची जाणवणारी टंचाई यांच्या संदर्भात आज राज्य सरकारची बैठक झाली असता या बैठकीत म्युकरमायकोसिसबरोबरच करोना प्रतिबंधासाठीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

*गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार, त्यानंतर लॉकडाउन संदर्भातला निर्णय होणार आणि आशा      सेविकांना करोनाच्या चाचण्या कऱण्याचंप्रशिक्षण देणार
*खासगी रुग्णालयातही मोफत उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु
*राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट प्राधान्यानं करुन घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना
*Amphotericin B च्या ६० हजार कुप्या एक जून रोजी राज्याला मिळणार
*जनरल टेस्टिंग बंद करुन फोकस टेस्टिंगवर भर देण्याचे आदेश
*महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिसवर संपूर्णपणे मोफत उपचार कऱण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
*म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी लागणाऱ्या Amphotericin B या औषधासाठी ग्लोबल टेंडर काढलं.

पुढे टोपे असंही म्हणाले कि, सर्वांच्या सलग चाचण्या करणं टाळायला हवं कारण, बाधितांच्या जवळच्या ज्या रुग्णांना सर्वाधिक धोका आहे तसंच ज्यांना कमी धोका आहे, अशांच्याच चाचण्या कऱण्यात याव्यात. जनरल टेस्टिंग टाळून फोकस टेस्टिंगवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला असून त्याबद्दलच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या असल्याचं टोपे यांनी सांगितलं.