लीड कोण तोडणारा असेल, तर मी माघार घेण्यास तयार – खासदार उद्यनराजे

0
727

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मला विरोध करणाऱ्यांची ताकद किती हे पक्षाने पाहिले पाहिजे. उमेदवारी मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. गेल्या वेळेला मला मिळालेले मताधिक्य पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. माझे लीड कोण तोडणारा  असेल, तर मी माघार घेण्यास तयार आहे, असे  खासदार उद्यनराजे भोसले यांनी म्हटले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मला विरोध नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

साताऱ्यातून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छूक आहोत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे खासदार उद्यनराजे भोसले यांनी म्हटले आहे. तर इतर पक्षातही आपले मित्र आहेत, असे सांगून त्यांनी राष्ट्रवादीला सूचक इशाराही दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील  मतदारसंघनिहाय आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीला उदयनराजे भोसले उपस्थित होते. दरम्यान, वाहतूक कोंडीत अडकल्याने या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या मुख्यालयात पोहोचायला त्यांना उशीर झाला.