“लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्य नाही”

0
360

नवी दिल्ली, दि.१५(पीसीबी) – लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्य नाही, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट करत निर्णय दिला आहे.

उत्तर प्रदेशातील गाझिपूरसह तीन जिल्ह्यांच्या मशिदींमध्ये अजानच्या बंदीसंदर्भात दाखल करण्यात याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्य नाही, असं सांगत मशिदींमध्ये तोंडी अजानसाठी परवानगी आहे, परंतू लाऊडस्पीकरवरुन अजानसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. अलाहाबाद हायकोर्टाने गाझिपूर, हाथरस आणि फर्रुखाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत मशिदींमध्ये तोंडी अजानसाठी परवानगी दिली आहे, परंतू लाऊडस्पीकरवरुन अजानसाठी परवानगी दिली नाही.

दरम्यान अजान लाऊडस्पीकर किंवा इतर कोणत्याही उपकरणांशिवाय मानवी आवाजात मशिदींमधून पठण करु शकतात. लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही. लाऊडस्पीकर नव्हते त्यावेळीही अजान होत होती, असा निर्णय न्यायमूर्ती शशिकांत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने दिला.