लग्नाचे आमिष दाखवून नात्यातील तरुणीवर बलात्कार

0
340

दिघी, दि. १३ (पीसीबी) -लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने नात्यातील तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत च-होली फाटा, आळंदी येथे घडली.

पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी तरुणीचा नातेवाईक आहे. त्यामुळे त्या दोघांची लहानपणापासून ओळख आहे. आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध करून बलात्कार केला. त्यानंतर तरुणीसोबत लग्न करण्यास तरुणाने नकार दिला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.