रोममध्ये लघुशोध प्रबंद सादर करण्यासाठी गेलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यावर ऍसिड हल्ला; राष्ट्रपतींना ट्वीट करताच मिळाला मदतीचा हात

0
548

रोम, दि. २८ (पीसीबी) – आळंदीतील एमआयटी या शिक्षण संस्थेत संगणकशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या हर्षित अगरवाल या तरुणावर रोमध्ये चोरट्यांनी ऍसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या हर्षितची प्रकृती स्थीर असून तो लवरकच मायदेशी परतणार आहे.  

प्राप्त माहितीनुसार, आळंदीतील एमआयटीत शिक्षण घेणारा हर्षित हा रोममध्ये लघुशोध प्रबंध सादर करण्यासाठी गेला होता. प्रबंध सादर करून बुधवारी तो मायदेशी परतणार होता. मात्र टेस्कोलाना मेट्रो स्टेशनवर अज्ञात चोरट्यांनी त्याची बॅग चोरण्यासाठी त्याच्यावर ऍसिड हल्ला केला. तसेच बॅगेसह त्याचा पासपोर्ट, पैसे आणि इतर कागदपत्र चोरुन नेले. मात्र हर्षित त्याच्या मोबाईलमुळे बचावला. एवढ्या मोठ्या भयाड हल्यात जखमी झालेल्या हर्षितने घरी फोन करून सर्व प्रकार सांगितला. प्रसंगावधान राखून जवळच्या पोलीस ठाण्यातही तक्रार केली.

त्यानंतर काही वेळातच त्याने भारताच्या राष्ट्रपती, परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान यांना मदतीचे ट्विट केले. त्याच्या ट्विटची दखल घेत काही तासातच त्याला मदत करण्यास प्रशासन पुढे आले. सध्या तो सुरक्षित असून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्याच्याशी व्यक्तिशः संवादही साधला आहे. पुढील दोन दिवसात कागदपत्रांची पूर्तता करून तो भारतात परतेन. या संदर्भात त्याने फेसबुकच्या माध्यमातून भारतीय प्रशासनाचे आभार देखील मानले आहे.