रोटरीच्या माध्यमातून कापडी पिशवी घरोघरी अभियानास सुरवात

0
176

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – प्रोजेक्ट धरित्री` या महिला सबलीकरण आणि पर्यावरण रक्षण या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१(पुणे) यांच्या सहयोगाने आणि व्हॉल्ववर्क्स इंडियाच्या CSR निधीच्या माध्यमातून प्लास्टिक करीबॅग वापर कमी होण्यास मदत होण्यास १ लाख कापडी बॅग अभियान हा सिनर्जी प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे.

प्रदूषणाच्या समस्येसेने पूर्ण जगाला ग्रासले आहे जागतिक तापमानवाढीने सर्वजण चिंतेत आहेत, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या जीवनशैलीत लहान लहान बदल घडवावा लागेल तरच आपण सर्वजण आपल्या वसुंधरेला हरित आणि प्रदूषण मुक्त करू शकतो.

हे जाणून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी डिस्ट्रिक्ट ३१३१(पुणे) आणि Environment टीम यांच्या सहयोगाने व्हॉल्ववर्क्स इंडियाच्या CSR निधीच्या माध्यमातून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे गव्हर्नर अनिल परमार ह्यांच्या मार्गदर्शनात पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि स्वच्छ भारत 🇮🇳 अभियानाला बळकटी देण्यास प्रदूषणाचे मुख्य कारण असणारी प्लास्टिक कॅरीबॅग समस्या दूर करण्यास १ लाख कॉटन बॅग नागरिकांना देण्याचा मेगा सिनर्जी प्रोजेक्ट तयार केला आहे.

या प्रोजेक्टच्या माध्यमातून उत्तम प्रतीच्या कॉटनच्या मोट्या आकाराच्या बॅग स्लोगन आणि रोटरीच्या लोगो सहित बनवण्यात आल्या आहेत ज्या शहरातील विविध रोटरीच्या क्लबच्या माध्यमातून सिनरजि प्रोजेक्ट अंतर्गत नागरिकांना देण्यात येतील. जागृती करण्याच्या हेतूने बाजारमूल्य 40 रुपये असणारी ही बॅग नागरिकांना मकरसंक्रांती निमित्त, किंवा इतर कार्यक्रमास भेट देण्यास 12 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार ह्यांच्या मार्गदर्शनात चालू असलेल्या ह्या प्रोजेक्ट मध्ये शहरातील विविध रोटरी क्लब सामाजिक संस्था सोसायटी शाळा ह्यांनी सहभाग घ्यावा आणि पर्यावरण रक्षणास साह्य करावे असे आवाहन टीम रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने प्रेसिडेंट गणेश बोरा आणि संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्या कडून करण्यात आले.