रिया चक्रवर्तीचा ड्रग्ज डिलर्सशी सतत संपर्क; ‘अंमलीपदार्थ विरोधी ब्युरो’कडून गुन्हा दाखल

0
390

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअप चॅटवरुन तिचा ड्रग्ज डिलर्सशी सतत संपर्क असल्याचे नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे त्याबरोबरच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याचं बोललं जात आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ‘अंमलीपदार्थ विरोधी ब्युरो’ कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून दिवसागणिक नवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीचे व्हॉट्सअॅप चॅट नुकतेच सीबीआयसोबत शेअर केले होते. ‘नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो’नं यामध्ये ड्रग्जचा वापर आणि व्यापार झाल्याचा आरोप ठेवला होता. रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून ती MDMA, हशिश आणि मारीजुना नावाच्या ड्रग घेत असल्याचं समोर आलं आहे.

त्याचबरोबर सुशांतलाही तीने याचं सेवन करण्याबाबत बोललं जात आहे. काल रियाच्या वकिल सतीश मानेशिंदे यांनी यासंदर्भात एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं आहे कि, ‘रियानं आजपर्यंत आपल्या जीवनात कधीही ड्रग्ज घेतले नाहीत.’ तसेच रिया कधीही आपल्या रक्ताची चाचणी करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.