राहुल गांधींना ‘अ ब क ड’ असे शिकवावे लागते; अरूण जेटलींचा राफेलवरून निशाणा

0
657

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – एनडीए सरकारने केलेला राफेल करार युपीए सरकारच्या करारापेक्षा ९ ते २० टक्क्यांनी स्वस्त आहे. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी कसलाही अभ्यास न करता आरोप करत आहेत, असे सांगून  त्यांनी एक लाख ३० हजार कोटी रुपयांचा आकडा कुठून आणला, हेच समजत नाही. राफेलचा एकूण करार ५८ हजार कोटी रुपयांचा आहे, असे केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी आज (बुधवार) सांगितले.  

राहुल गांधी यांची समज अशी आहे ती त्यांना अ ब क ड असे शिकवावे लागते, अशी टीका जेटली यांनी करून  राहूल गांधी यांच्या आरोपांना  उत्तर दिले. मोदी सरकारने राफेल करार करताना अनिल अंबानींना ३० हजार कोटींचा थेट फायदा करून दिल्याचा आरोप राहूल गांधींनी केला होता. तसेच राफेल हा प्रचंड मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, या आरोपांना जेटली यांनी उत्तर दिले आहे.

राहूल गांधींना वाटते की फायटर विमाने बनवण्याचे काम दासू भारतीय कंपनीला देणार आहे. परंतु तसं नसल्याचे सांगून जेटली यांनी राहूल यांची खिल्ली उडवली. हिंदुस्थान एरोनॉटिक्सला विमानांच्या निर्मितीचे काम न देण्याचा निर्णय युपीए सरकारनेच घेतल्याचे जेटली यांनी सांगितले.