राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदासाठी मातेले, इंगळे, मानकर, देशमुख, शिंदे यांची नावे आघाडीवर

0
496

मुंबई,दि.१८(पीसीबी) – नुकत्याच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेशअध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दूहन, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी मुंबई कार्यालयात मुलाखती घेतल्या. फेब्रु २०२० मध्ये माजी प्रदेश अध्यक्ष अजिंक्य राणा यांनी वैयक्तिक कारण सांगत अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांनी राजीनामा दिल्यापासून या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी अनेक विद्यार्थी चळवळीतील विद्यार्थी प्रयत्न करत आहे.

अमोल मातेले – अमोल मातेले यांनी आजवर विद्यार्थी चळवळीत खुप छान काम केल आहे .मुंबईतील विद्यार्थीना त्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे .त्यांना मुंबई प्रदेश अध्यक्ष पदाचा अनुभव ही त्यांच्या जमेची बाजू आहे. त्यातच मुंबईचे अध्यक्ष असताना पक्षातील अनेक नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. ते शांत व उच्य शिक्षित आहेत .

सन्नी मानकर – सन्नी मानकर हे अनेक वर्षे झाले विद्यार्थी चळवळीत काम करत आहेत. सद्या ते विद्यार्थी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दूहण यांच्या सोबत काम केले आहे ही त्यांच्या जमेची बाजू आहे .तसेच ते पुण्यातील असल्यामुळे त्यांना पक्ष संधी देऊ शकते ही चर्चा आहे सोबतच पुण्यातील पक्षाचे 2 जेष्ठ मंत्री 4-5 आमदार यांनी मानकर यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केल्याची चर्चा आहे .

स्वप्निल इंगळे – इंगळे हे मराठवाडा येथील नांदेड जिल्ह्याचे त्यांनी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदेश सरचिटणीस ह्या पदांवर काम केल आहे. विद्यार्थी चळवळीतला खुप दांडगा अनुभव व विद्यार्थ्यांनी केलेले त्यांच्या साठी शेकडो ट्वीट्स पक्षाच्या नेत्यांना एस.म.स ही त्यांची जमेची बाजू आहे. सोबतच त्यांनी काढलेले विद्यापीठवर मोर्चे ही बाब लक्षणीय आहे असे स्वता त्यांच्या इंटरव्यू मध्ये जयंत पाटिल साहेब म्हणले .सोबतच मुंबईमधील एक मंत्री व विद्यापीठचे 2 माजी कुलगुरू यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नावाची शिफारस केल्याची चर्चा आहे . तसेच विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष यांच्या खुप जवळचे मानले जाते.

सौरभ देशमुख – सौरभ देशमुख हे अनेक वर्षा पासून विद्यार्थी चळवळीत सक्रिय आहेत त्यांनी विद्यार्थ्यांन साठी अनेक आंदोलने केलीत उत्तम वक्रूत्व शैली संघटन कौशल्या अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या साठी पक्षातील 2 मंत्री 2 आमदार यांनी शिफारस केली आहे याची चर्चा आहे . त्यांनी तालुका अध्यक्ष तसेच जिल्याच्या सोशल मीडिया सेल पदावर काम केल आहे .

दयानंद शिंदे – दयानंद शिंदे यांच्या पण नावाची जोरदार चर्चा आहे ते सध्या विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र संघटक आहेत तसेच उत्तम वक्ता, संघटक, सामान्य शेतकरी कुटुंबातील उगवत नेत्रूत्व अशी त्यांची ओळख आहे. पक्षाचे आमदार तसेच शरद पवार साहेबांचे नातू रोहित पवार यांच्या खुप जवळचे ते मानले जातात . त्यांनी रोहित पवारांना सोबत अनेक वर्षे झाल काम केल आहे ही त्यांच्या जमेची बाजू मानली जाते. त्यांनी पुण्यात विद्यार्थी संघटनेच खुप काम केल आहे. पक्ष संधी सामान्य कार्यकर्त्याला देणार असेन तर नक्कीच या नावचा विचार आधी करण्यात येईल.

तसेच औरंगाबाद मधून मयुर सोनवणे , दीक्षा पवार , रुषिकेष देशमुख धुळ्यातून नंदन भस्करे , यवतमाळ मधून अनुज पाटिल , पंकज लोखंडे नांदेड मधून श्रीकांत मांजरमकर, हिंगोलीतून देशमुख यांची नावे चर्चेत आहेत.