राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये नव्या तसेच जुन्या कार्यकर्त्यांना संधी..

0
391

पिंपरी,दि. २८ (पीसीबी) : थोड्याच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक सेलच्या नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून नव्या तसेच जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. नवनिर्वाचित शहराध्यक्ष मा.श्री. अजित दामोदर गव्हाणे यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नुतन युवक कार्यकारिणी जाहीर करायची आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक सेलचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी दिलीय .

यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सचिव आणि कार्यकारिणी सदस्य यांसह अनेक निवडी जाहीर करण्यात येणार आहेत .. शहर युवक कार्यकारिणी मध्ये जुने व नवीन असे सर्वसमावेशक कार्यकर्त्यांचा समावेश असेल . मागील कार्यकारिणीमध्ये कोणी कसे काम केले ,कोणकोणते उपक्रम राबवले या सगळ्याचं मोजमाप करून त्यांची पुन्हा निवड केली जाणार असल्याचं समजते. इच्छुकांचे अर्ज २८ मार्च ते शुक्रवार दिनांक १ एप्रिल या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पक्ष कार्यालय, मुंबई पुणे हायवे, खराळवाडी, पिंपरी, पुणे या ठिकाणी स्वीकारले जातील .

ज्या युवकांमध्ये समाजासाठी काम करण्याची तळमळ, नेतृत्व करण्याची क्षमता असतील, तर त्यांना पक्षात काम करण्याची संधी दिली जाणार आहे . युवापिढीच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी युवकांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, तरच चित्र बदलणार आहे.तसेच गेल्या ३-४ आंदोलनांमध्ये शहरातील युवकांचा सर्वात जास्त सहभाग असून राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना आम्ही संधी देणार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक सेलचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी पीसीबी टुडे प्रतिनिधींशी बोलतांना सांगितलं.