राष्ट्रवादी- काँग्रेसवर नाराज असलेले रामराजे निंबाळकर भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

0
494

मुंबई, दि. ३० (पीसीबी)- विधानपरिषदेचे सभापती रामराजे भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेल्या रामराजेंनी कुठल्या पक्षात जाणार याबाबत बऱ्याच दिवसांपासून मौन बाळगले आहे. उदयनराजे जर भाजपात गेले तर रामराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश होईपर्यंत वेट अँड वॉचचं धोरण रामराजेंनी स्वीकारलं आहे.

रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. परंतु सध्या ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय झाल्यावरच ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. याला कारण म्हणजे राजराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचे वृत्तही येत आहे. येत्या काही दिवसात होणाऱ्या मेगाभरतीत उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे दोघेही भाजपमध्ये गेले तर वाद पुन्हा होऊ शकतो.