राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले, आणि १२ वा खेळाडू म्हणून बसले – मुख्यमंत्री

0
612

अहमदनगर, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन  म्हणून मैदानात उतरले आणि ७ दिवसात १२ वा खेळाडू म्हणून  बाहेर बसले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.

अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत  मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी  त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससह पक्षाध्यक्ष  शरद पवार यांच्यावर  तोफ डागली.

दरम्यान, शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणणा केली होती. त्यानंतर त्यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. पवार यांच्या या बदलत्या भूमिकेवर अनेक दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. यावरच मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावला आहे.