रावेतमध्ये कारमधून बाहेर ओढून तरुणावर कोयत्याने वार

0
646

रावेत, दि. ३० (पीसीबी) – कारमधून निघालेल्या एका तरुणाच्या आडवी दुचाकी लावून चार जणांच्या टोळक्यांनी त्याच्यावर कोयताने जबर वार केले. ही घटना रावेत येथील भोंडवे कॉर्नर जवळील रस्त्यावर घडली.

दिनाकर भास्कर शेट्टी (वय २९, रा. ५०७, शांताई क्लासिक, रावेत) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरमी त्याने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२८) रात्री साडेदहाच्या सुमारास दिनाकर हे त्यांच्या कारमधून रावेत येथील भोंडवे कॉर्नर जवळील रस्त्यावरुन चालले होते. यावेळी दुचाकी वरुन आलेल्या अज्ञात चौघा हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी दिनाकर यांच्या कारच्या आडवी लावली. तसेच दिनाकर यांना कारच्या बाहेर खेचून त्यांच्यावर कोयत्याने वार केले आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. चौघेही आरोपी सध्या फरार आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.