राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही? देश तर सर्वांचा आहे – शरद पवार

0
667

लखनऊ,दि.२०(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी “तुम्ही जसं राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करू शकता तर मग मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना का निर्माण करू शकत नाही?” असा सवाल केला आहे. देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहे.

लखनऊ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला मशिदीच्या निर्मितीसाठी तुम्ही ट्रस्टची स्थापना का करू शकत नाही? असा प्रश्न केला आहे. शरद पवारांनी बोलताना, लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे, असा आरोप केला आहे. लखनऊ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनाप्रसंगी शरद पवार बोलत होते. एएनआयने या संदर्भात माहिती दिली आहे.

जनता आता तुमच्या भूल थापांना बळी पडणार नाही. सीएए आणि एनआरसीमध्ये काही त्रुटी आहेत. यामध्ये मुस्लीम अल्पसंख्यांकांकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.

राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही ? – शरद पवार

राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही ? – शरद पवार

Gepostet von PCBToday.in am Donnerstag, 20. Februar 2020

दरम्यान, अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापन करण्यात आली आहे. दिल्लीत या ट्रस्टची काल पहिली बैठक पार पडली.